शिवजयंती

शिवचरित्र, आपण आणि सद्यस्थिती:*

*जयंती म्हणजे जयंती नसून जयंतीतून जागृतीकडे जाणे आहे.*
           आज मी आपल्याशी मुक्त संवाद साधत आहे. प्राचीन भारताचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. भारत हा देश ज्ञानाचे माहेरघर आहे. पहिला ज्ञानाचा गौरव तथागत बुद्धाने केला.  भिखु संघाच्या माध्यमातून धम्माचे ज्ञान सर्वत्र प्रवाहित केले. बौद्ध साहित्यात त्याचा उल्लेख जागोजागी आहे. सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये तक्षशिला सारखी जगविख्यात विद्यापीठ या भारतात होती. 
*चरिथ भिक्खव्वे चारिक, बहुजन हिताय बहुजन सुखाय ।  लोकांनु कंपाय , आत्तानु हिताय । आदि कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण !!*
या पाली भाषेतील बुद्धांची शिकवण देणाऱ्या ओळी छत्रपती शिवाजीच्या शिवराज्याचे वैशिष्ट्य सांगून जातात. 

                आज आपण शिवजयंती साजरी करतो, जयंती म्हणजे फक्त फोटोला हार घालून डॉल्बीच्या तालावर नाच करणे नाही, जयंती म्हणजे फक्त  भगवे फेटे आणि झेंडे घेऊन जय शिवाजी जय भवानी घोषणा देणे म्हणजे जयंती नाही. जयंती म्हणजे जागृतीकडे जाणे आहे. जयंतीचा अर्थच जागृती आहे. आज समाजाला जयंतीकडून जागृतीकडे नेण्याची गरज आहे. म्हणून आज समाजप्रबोधनाची गरज आहे. आज फक्त  शिव, शंभू, शाहू, फुले, आंबेडकर, बसव यांच्याच जयंती साजऱ्या होतात आपल्या पूर्वजांच्या जयंती का होत नाहीत ? हा विचार आपण केला पाहिजे. 

    

*”जे स्वतःसाठी जगतात ते कायमचे मरतात, जे समाजासाठी जगतात, ते मरूनही नेहमीच जिवंत राहतात.”*
         हाच ओजस्वी इतिहास आहे माझ्या राजाचा.  मरावे परी किर्तीरूपे उरावे, ही पंक्ती सत्यात उतरविणारे आदर्श स्वराज्य संथापक म्हणजे छ. शिवाजीराजे. या राजाने सोने, मोती माणिक, हिरे नाही कमविले तर सोन्यासारखी माणसे कमविली. धर्मासनावर सत्तासनाची राजवट निर्माण करणारी आदर्श राजवट म्हणजे म्हणजेच शिवशाही. 
          भारताच्या इतिहासात नेहमीच दोन शाही होत्या एक होती एक होती सरंजामशाही आणि दुसरी होती राजेशाही.  शिवरायांची राजवट ही सरंजामशाहीची राजवट होती. राजेशाहीत राजाच कौतुक नेहमीच होते पण  लोकशाहीत राजाच कौतुक गौरव व्हावा असा एकमेव माझा छत्रपती शिवाजी राजा.

राजेशाहीत, सरंजामशाहीत लोकशाही निर्माण करणारा एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. सर्वांस पोटास लावणे हाच स्वराज्याचा सरनामा होता.  

शिवशाही म्हणजेच लोकशाही, शिवराज्य म्हणजे  बुद्ध- बसव- भीम यांच्या स्वप्नातील लोकसत्ताक लोकशाही पद्धती.
      महाराज्यांच्या पूर्वी  कोणतेही मराठा राजवट भारतात नव्हे तर जगात कोठेच नव्हती.  बौद्ध, जैन धर्माला अनेक राज्यानी राजाश्रय दिला होता. अनेक बौद्ध, जैन राजे भारतात होऊन गेले आहेत.  शिवाजी महाराज म्हणजे पूर्वी  कोणीतरी स्थापन केलेल्या गादीवर बसून राज्यकारभार करणारे राजे नव्हते.  सर्वांस पोटास लावणे हाच स्वराज्याचा सरनामा हृदयाशी कवटाळून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे प्रजाहितदक्ष राजे म्हणजे  शिवछत्रपती. ते एक स्वतंत्र राज्यसंस्थापक होते. शिवशाहीत मावळे इमानदार होते. आजच्या नेत्यासारखे आणि कार्यकत्यासारखे पैशाला, मद्याला आणि मांसाहारी जेवणाला विकले जाणारे नव्हते. शिवरायांशी, स्वराज्याशी इमान ठेवणाराच खरा मावळा.  मावळा एका जाती धर्मापुरता मर्यादित नव्हता.  मावळा म्हणजे मावळ प्रांतात राहणारा, गडकपाऱ्यात भटकणारा, स्वराज्य स्थापनेत रक्त सांडणारे अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार लोक म्हणजे मावळे. मावळे आणि मराठे ही व्यापक संकल्पना आहे. मराठा जातीचे नाव नसून, कार्याचे , कर्तृत्वाचे आणि शौर्याचे नाव आहे. मावळप्रांतात राहणारे सर्व कुणबी खऱ्या अर्थाने शिवरायांचे मावळे आहेत. 
         शिवरायांचे कार्य आणि राज्य , हे त्यांच्या राज्यात राहणाऱ्या सामान्य माणसाला – रयतेला आपले राज्य वाटत होते, हेच शिवशाहीचे वैशिष्ट्य आहे.  माझ्या मते उत्तम राज्याच्या सर्व संकल्पना शिवशाहीत पूर्ण झाल्या, खरे तर तेच उत्तम राज्य आहे. 
          सध्या चित्र फार वेगळं आहे. लोकशाही, लोकशाही म्हणून गौरव  करणाऱ्यांनो, खरी लोकशाहीची मूल्ये तुम्हाला माहिती आहेत का ?  आज आपण आणि शिवशाही यात जवळजवळ ३५० वर्षाचे अंतर आहे.  आता सरंजामशाही काही उपयोगाची नाही, हे जरी खरे असले तरी लोकशाहीचा पुरेपूर फायदा लोकांना मिळत नाही, हेही तितकेच खरे आहे. बिकाऊ नेते आणि  कार्यकर्ते यांनी सामान्य माणसाची गळचेपी केली आहे. 
        *खुद को बुलंद कर इतना,….* या कवितेच्या ओळी फक्त कवितेतच राहिल्या. मन- मेंदू- मनगट असक्षम असणारी ही रयत आज सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक गुलाम बनत आहे.  
       पन्हाळ्याला सिद्धी जोहार आणि फादरखान यांनी वेढा दिला.  हा वेढा तोडण्यासाठी  नेताजी पालकरांनी सिद्धी हिलालच्या साह्याने दिलेला लढा नाकामयब  ठरला. स्वराज्यातील सेनापतीला हार मानावी लागली होती. जेथे वेढा पातळ असेल तेथून वेढ्यातून बाहेर पडायचे असे ठरले. त्यासाठी खोटा शिवाजी तयार करण्यात आला. त्याला महाराजांसारखी वेशभूषा केली, कपाळाला चंद्रकोर लावली. गळ्यात कवडीची माळ घातली आणि हा खोटा शिवाजी पालखीत बसला.  पुढे निघून गेला. तो सिद्धी जोहरच्या हाती सापडला. त्याला माहिती होते की खान आपल्याला पकडणार आणि मारणार. किंबहुना खानाने त्याला पकडावे आणि सैन्य गाफील होऊन वेढा सैल व्हावा. त्या संधीचा फायदा घेऊन महाराज पन्हाळगडावरून निसटले ते विशाळगडाकडे गेले. पकडलेल्या खोट्या शिवाजीचा खानाने खातमा केला.  तो खोटा शिवाजी होता, शिवा न्हावी.  आपल्या मृत्यूची पूर्वकल्पना असतानाही मृत्यूला हसत हसत कवटाळणारा शिवा न्हावी एकटाच नव्हता.  शिवरायांच्या घोडदळ, पायदळ यात असंख्य मावळे स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावायला तयार होते. 
                 महाराज पन्हाळगडावरून निसटले, विशाळगडाकडे निघाले. बाजीप्रभूसह मूठभर मावळ्यांनी घोडखिंड अडवली. महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळाली. महाराज विशाळगडावर पोहचले.  बाजीप्रभूंना वीरमरण आणि अनेक मावळे गतप्राण झाले. आज इतिहासाला त्यांची नावेही माहीत नाही.
 बाजीप्रभु आणि मूठभर मावळे का लढले ? तीच भावना, मेलो तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. 
         या अमरहुतात्म्यांच्या प्रेरणा घेऊन आज शिवइतिहासाची पाने चाळत आहोत.  तरीही आज युवकांकडे पाहिले तर वाटते , आजचा युवक नक्की कोठे हरवला आहे.  व्हाट्सअप्पच्या, फेसबुकच्या युगात जगणाऱ्या युवकाला आज महापुरुष वाचण्यासाठी वेळ नाही. शीला, मुन्नी, शालू आमचं सगळंच काम हळूहळू.  बाप कामातून बाहेर येत नाही आणि बाहेर आलाच तर नशेत बुडून जातो. आईच्या मागचे अवडंबर, व्रतवैकल्ये, सण-समारंभ सुटत नाहीत, सुटलीच तरी  घर-घर की कहाणी कधी संपत नाही.  मुलीचा निम्म्याहून अधिक वेळ व्हाट्सअपवर  चाॅटिंग आणि मोबाईल फोनवरच जातो.  सकाळी एकाशी पॅचअप, संध्याकाळी एकाशी ब्रेकअप, यातच माझ्या युवापिढीचा वेळ जातो. आम्ही महापुरुष वाचणार कधी ?
           शेतकऱ्यांच्या बाबतीत  महाराजांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आजपर्यंत  सत्तेत आलेल्या कोणत्याही राजकिय पक्षाने अशी भूमिका आजपर्यंत घेतली नाही. उदध्वस्त झालेली गावे महाराजांनी कौलनावे देऊन पुन्हा वसवली.  शेतकऱ्यांना शेतीसाठी बी- बियाणे औतफाटा देऊन मदत केली.  शेतीला प्रोत्साहन दिले. शेतीवरील महसूल कमी केला, शेतसारा कमी केला. 

दुष्काळात महसूल माफ केल्या याउलट दुष्काळात शेतकऱ्यांना मदत केली. स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करण्याऱ्याच्या नावे लावून तिची नोंद महालकऱ्याच्या दप्तरी असे. जमीन मोजण्यासाठी काठी केलेली असे ती पाच हात पाच मोठी लांब असे एका हाताची लांबी १४ तसू काठीची लांबी ८२ तसु असे.  प्रत्येक शेतकऱ्यास किती पीक व्हावे, हे पिकाची पाहणी करून ठरवीत.  एकूण शेतीच्या उत्पन्नाचे ५ भाग करून त्यापैकी ३ भाग शेतकऱ्यांना आणि २ भाग सरकारला असा करार होता. सरकारदेणे शेतकऱ्याला नगदी किंवा धान्याच्या रुपात द्यावे लागत असे.  नापीक जमिनीच्या शेतकऱ्याला गुरे ढोरे सरकारातून दिली जात असे.  अवर्षण, दुष्काळ प्रसंगी शेतकऱ्यांना मदत केली जात असे.
      खऱ्या अर्थाने महात्मा बसवण्णांच्या स्वप्नातील राज्यकारभार कसा असावा, हे शिवरायांनी दाखवून दिले.  महात्मा बसवण्णा एका वचनात म्हणतात,  राजा हा जनतेच्या मालक नसून,  सेवक आहे.  ही शिकवण शिवरायांनी आपल्या राज्यकारभारात तंतोतंत उतरवली. 
 शिवचरित्राचे अनेक पैलू मांडता येतील, पण वेळेअभावी त्यासर्व पैलूंचे आपण स्मरण करू.

जहागिरी-इनामदारी- वतनदारी व गावगाडा,  रयतेची कणव असणारा राजा,  शिवाजी महाराजांची स्त्रियांच्या गौरवार्थ भूमिका,  शिवाजी महाराज आणि राज्यकारभार, सुखी समाधानी रयत,  शेतकऱ्यांचे सैन्य, व्यापार उद्योगास संरक्षण, गुलामांच्या व्यापारास बंदी, महाराजांची सर्वधर्मसमभाववृत्ती, शिवरायांच्या इतिहासाचा विपर्यास का ? इ मुद्यांवर विस्तृत विवेचन करता येईल. 

*लेखक: अभिषेक देशमाने, ९८२२०५४२९१.*

Advertisements

अहिसमूर्ती किन्नरी ब्रम्हय्या. 

शरण किन्नरी ब्रम्हय्या हे ऊडुरु येथील रहिवाशी होते. ते सोनार म्हणून कायक करत होते. बसवण्णांची कीर्ती ऐकून ते कल्याणला येतात, तेथेच वास्तव्य करतात. कल्याणच्या  मंदिरात एकतारी वाजविण्याचे कायक करतात.  त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते  जंगमदासोह करतात. ते एकतारी वाजविण्याचे कायक करत असल्याने त्यांना किन्नरी असे म्हंटले जाते.  

शरण किन्नरी ब्रम्हय्या आणि महात्मा बसवण्णा

 एकदा बसवण्णांच्या महामनेत संध्याकाळच्या वेळी दासोह घेण्यासाठी शरण येतात. त्यात किन्नरी ब्रम्हय्या पण असतात. प्रसाद घेत असताना ब्रम्हय्या  एका शरणांकडे कांदा मागतात. बसवण्णा उपहासाने ब्रम्हय्यांना  म्हणतात, ” तुम्ही कांदा खाता ? ”  बसवण्णांच्या या उपहासाच्या बोलण्याने ब्रम्हय्या रागावतात आणि महामनेतून जेवण सोडून निघून जातात.  ब्रम्हय्या रागाने निघून गेल्यानंतर बसवण्णांना वाईट वाटते. ब्रम्हय्यांची समजूत काढण्यासाठी बसवण्णा दुसऱ्या दिवशी ब्रम्हय्यांकडे जातात. त्यांना भेटायला जाताना त्यांना कांदे आवडतात म्हणून एक बैलगाडीत भलीमोठी कांद्याची प्रतिकृती तयार करून ती बैलगाडी कांद्याने सजवितात. त्यांच्यासाठी कांदे भेट म्हणून घेऊन जातात. ब्रम्हय्यांची समजूत घालतात, दोघेही एकमेकांच्या गळ्यात मिठी घालून “शरणू” म्हणून नमस्कार करतात. या प्रसंगावरून बसवण्णांची नम्रता आणि क्षमाशीलता दिसून येते, बसवण्णा जसे बोलले तसे जगले. म्हणूनच ते म्हणतात- “बोलल्याप्रमाणे वागले नाही तर कुडलसंगमदेव कसा प्रसन्न होईल.” बसवण्णा आपल्या वचनातून कोणीही माझ्यापेक्षा लहान नाही असे सांगतात-

कोणीही माझ्यापेक्षा लहान नाही,

शिवभक्तांपेक्षा महान नाही, 

याला माझे मन साक्षी,

तुमचे चरण साक्षी, कुडलसंगमदेवा
अहिंसामूर्ती किन्नरी ब्रम्हय्या

एकदा त्रिपुरांतक मंदिरात एक जार त्याच्या वेश्येच्या नवसपूर्तीसाठी  एक बकरी बळी देण्यासाठी येतो. बळी देण्यापूर्वी ती बकरी गळ्यातील बांधलेल्या  दोरीतुन सुटते, ती मंदिरात जाते. बकरीच्या मागे जार पण मंदिरात येतो, त्या बकरीला पुन्हा दोरीने बांधतो. ती बकरी मरणाच्या भीतीने जोरात ओरडत असते. ते पाहून किन्नरी ब्रम्हय्या त्या जाराला त्या बकरीचा बळी देऊ नये , म्हणून सांगतात. तो जार काहीही झाले तरी ब्रह्मय्याचे ऐकायला तयार नसतो . ब्रम्हय्या आणि जार यांच्यात भांडण होते. शेवटी ब्रम्हय्या त्या बकरीचा किंमत देऊन बकरीला सोडवून घेतात. 
ब्रम्हय्या आणि अक्कामहादेवी 

अक्कमहादेवीना कल्याणमध्ये भेटलेली पहिली व्यक्ती म्हणजे किन्नरी ब्रह्मय्या.  किन्नरी ब्रह्मय्या अक्कमहादेवीची परीक्षा घेतात.महादेवी अक्कांची प्रगल्भता, तात्विक ज्ञान अध्यात्मिक उंची पाहुनी अक्कासमोर नतमस्तक होतात. आपल्या एका वचनात महादेवी अक्कांचे महात्म्य सांगतात. “वाघाच्या जबड्यातून वाचलो शरणूशरणार्थी, आई.” 
कल्याणक्रांतीमधील ब्रम्हय्यांची भूमिका –

शरण ब्रम्हय्यांनी वचन साहित्य संरक्षणासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. कल्याणक्रांतीनंतर बिज्जलाचे सैन्य आणि शरण यांच्यात युद्ध सुरू झाले. बिज्जलाच्या सैन्याने शरणांच्या कत्तली करण्यास सुरवात केली, वचन साहित्य नष्ट करण्यास सुरुवात केली. चेन्नबसवण्णांच्या नेतृत्वाखाली उळवीकडे निघालेल्या तुकडीमध्ये ब्रम्हय्यापण सहभागी होते. शत्रूशी झुंज देत-देत शरणगण वचनसाहित्य घेऊन उलवीला पोहचतात. उळवीत पोहचल्यावर चेन्नबसवण्णा ब्रह्मय्यांवर नदीकाठच्या संरक्षणाची जबाबदारी टाकतात. उरलेल्या सर्व  शरणांना घेऊन चेन्नबसवण्णा नदी पार करून पलीकडे जातात. उळवीच्या महामनेत वचनसाहित्य सुरक्षितपणे पोहचवतात. तोपर्यंत  ब्रम्हय्या नदीकाठावर अविरतपण बिज्जलाच्या  सैन्याचा मुकाबला करत असतात. शत्रू सैन्याला प्रतिकार करण्यासाठी उळवीच्या महामनेच्या बाहेर असणारी नदी ते गुहेकडे वळवितात, त्यामुळे शत्रूसैन्याला पुढे प्रतिकार करणे अशक्य होते. सैन्य माघारी फिरते. ब्रम्हय्यांनी वळविलेल्या नदीला  किन्नरी ब्रम्हय्यांची नदी म्हणतात. 
ब्रम्हय्यांची वचने-

१. 

सायीचे गरम दूध

सुवर्णपात्रातून पिण्यास भूषण असे पहा,

पण, मृत्तिका पात्रातून पिण्यास असे का ? 

मी केलेल्या शिवलिंग पूजेसाठी काया पवित्र असता,

अपवित्र कशी असेल, त्रिपुरांतकलिंगा ?
 २.

तुझे तारुण्य, रुपलावण्य, चतुर बोलणे, संपत्तीचा संतोष,

हत्ती, घोडे, रथ, पायदळाचे समूह, 

सती, सूत, आप्तबंधूंच्या समूहाचा,

 तुझ्या कुलाभिमानाचा गर्व सोडून दे, 

वेडा होऊ नकोस,

अरे, रोमजापेक्षा तू श्रेष्ठ आहेस का ? 

मदनापेक्षा सुंदर आहेस का ?

सुरपतीपेक्षा सुंदर आहेस का ?

वामदेव, वशिष्ठापेक्षा श्रेष्ठ कुलीन आहेस का ?

यमदूत येऊन,

हात धरून नेऊ लागताच बोलण्यास वाव नाही . 

अरे मानवा,

माझ्या महालिंग त्रिपुरांतक देवाची पूजा केली तर, अमरपदाची प्राप्ती होईल , वेड्या.

३.

असत्यरूपी तलवारीला देह बळी गेला.

काय म्हणावे या विधीच्या खेळाला. 

शम-दमादि गुण अंगी बाणले नाहीत, 

महालिंग त्रिपुरांतकाचे शरण हेच माझे मालक,

हे न ओळखले,

म्हणून भेद नि विस्मृतीत आपणच आश्रित झाले.
संदर्भग्रंथ: 

१.- शरण जीवन दर्शन – राजू ब.जुबरे. महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान , भालकी.

२.- वचन- संपादक: डॉ. एम. एम. कलबुर्गी ,   अनुवाद- सौ.  सविता सि. नडकट्टी, श्री शंकर म. पाटील. बसव समिती, बेंगळुरू.

लिंगायत एकता वधू-वर पालक परिचय मेळावा, पुणे.

कामाकरिता जात केली । काम विसरुनी जातचि धरली । जन्मजात थोरवी मिरविली । वर्णाश्रम धर्माच्या नावाने ।  – ( ग्रामगीता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.)*

*दिनांक: रविवार, १८ फेब्रुवारी२०१८. सकाळी ९ ते दुपारी ३, स्थळ: अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी, पुणे.*

*दिव्य सानिध्य:*
पूज्य श्री डॉ. बसवलिंग पट्टदेवरु ( भालकीमठ),
पूज्य श्री डॉ.  शिवलिंग शिवाचार्य ( अहमदपूर मठ),
पूज्य श्री जगतगुरु बसवानंद स्वामीजी,
पूज्य श्री कोरणेश्वर आप्पाजी,
पूज्य श्री अन्नपूर्णा माताजी,

*विशेष अतिथी:*
मा काकासाहेब कोयटे,
मा सरलाताई पाटील,
मा प्रदीप वाले,
मा. गुरुराज चरंतीमठ,
मा. सुनीलशेठ रुकारी,
मा विजयकुमार शेटे,
मा. आर. एस. देशिंगे,
मा. सतीश पाटील,
मा. बाबासाहेब कोरे,
मा  आप्पासाहेब वाले,
मा  रविंद्र चनाळे,
मा बसवराज कुलोळी,
मा. राजशेखर तंबाके,
मा. बी. एम. पाटील,
मा शिवाजी साखरे,
मा सविताताई नडकट्टी,
मा नारायण बहिरवाडे,
मा शिवलिंग ढवळीकर,
मा दयानंद कोटे,
मा.संध्याताई तोडकर.

*शरणूशरणार्थी बंधू-भगिनींनो…*
बाराव्या शतकात जातीप्रथा संपवण्यासाठी लिंगायत चळवळ सुरू झाली.  अनुभवमंटपाच्या माध्यमातून अठरापगड जातीच्या शरणांनी सामाजिक एकात्मतेचा आग्रह धरला.  त्यावेळी समतेच्या या लिंगायत आंदोलनांमध्ये पूर्वाश्रमीच्या अनेक उपेक्षित जाती आनंदाने सहभागी झाल्या.   जातही देवनिर्मित नसून मूठभर स्वार्थी धनदांडग्यांची देण आहे.  असे बसवादी शरणांनी परखडपणे सांगितले. लिंगायत धर्माचे ध्येयच जातीनिर्मूलन असल्यामुळे आपले व्यवसाय वेगळे असले तरी,  आम्ही एकच आहोत अशी ठाम श्रद्धा आहे.  बसवतत्वामध्ये जातीभेद मानत नाहीत.  जातीअंतासाठी बसवकल्याणमध्ये अनेक शरणांना मृत्युदंडाची शिक्षा झाली. तरीही व्यवहारांमध्ये आपण जाती पाळतोय.  खरतर हे लिंगायत तत्वांचे विकृतीकरण आहे.  महात्मा बसवण्णांचे चरित्र पायदळी तुडवून आपण फक्त चित्राची पूजा करतो, आता हे सगळे थांबूवूया.संपूर्ण दक्षिण भारतात लिंगायत  आंदोलन पेटले आहे. लढा यशस्वी करायचा असेल तर  आपण वाणी,माळी, तेली, कुंभार परीट, बुरुड, ढोर-कक्कय्या या जातीमध्ये विभागणी करणे योग्य नाही.  आपण सारे एक समान दर्जाचे असल्यामुळे रोजी-बेटी व्यवहाराचे क्रांतिकारी पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. काहींनी व्यक्तिगत पातळीवर असे सोयरे संबंध जोडले आहे,  हे स्वागतार्ह आहे  पण अजून मोठ्या प्रमाणावर समाजाची मानसिकता बदलण्यासाठी हा नूतन प्रयोग करीत आहोत.  आपल्यातील सुधारणावादी वैचारिक लिंगायत याचे स्वागतच करतील हा ठाम विश्वास बाळगून आम्ही हे काम हाती घेतले आहे.  खालील मुद्यांवर चिंतन करून मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे हि विनंती.
१) वाणी, माळी, तेली, कोष्टी, कुंभार यापैकी बहुसंख्य लोक पारंपारिक व्यवसाय करत नाहीत, उदाहरणार्थ कुंभार जर डॉक्टर व्यवसाय करीत असेल तर त्याला कुंभार का म्हणायचे ? कोष्ष्टी जर किराणा दुकान चालवत असेल तर त्याला कोष्टी का म्हणायचे ?  न्हावी जर वकिली व्यवसायात असेल तर त्याला न्हावी का म्हणायचे ?  धोबी जर धोबी व्यवसायात नसेल तरीही त्याला धोबी का म्हणायचे ?
२) आपल्यातील अनेक ओ.बी.सी, एन.टी जातीतील मुले उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर कार्यरत आहेत  तरीही आपल्यातील काही जण स्वतःला उच्चवर्गीय समजणारे काही लोक त्यांना बरोबरीचा दर्जा देत नाहीत, हे योग्य आहे का ?
३) आपण आपल्याच पोटजातीत स्थळ पाहतो,  यामुळे त्याला मर्यादा पडते.  मुलामुलींची वय तीस वर्षापुढे पोहचतात. आणि शेवटी आपण कोणती ही पोटजात चालेल म्हणतो. हीच तयारी अगोदर दाखवली तर लग्न वेळेत जमते की नाही ?
४) कोणत्याही पोटजातीतील स्थळ चालणार असेल तर अनुरूप स्थळे लवकर मिळतील.
५) मुलांच्या हट्टापायी लिंगायत धर्माबाहेर विवाह संबंधांना आपण स्वीकारतो मग लिंगायत धर्मांअंतर्गत स्थळ का स्वीकारायचे नाही ?
६) लिंगायत धर्मातील सर्व जातींचे संस्कार व विधी जन्मापासून मरणापर्यंत समान असतील तर अडचण काय आहे ?
७) जर आपण विविध जातीच्या तुकड्यांमध्ये राहण्याचा हट्ट केला तर लिंगायत एकी कशी होईल ?

*या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी महत्त्वाच्या अटी:*

१)  आपण लिंगायत धर्मीय असून महात्मा बसवेश्वरांच्या समतावादी मूल्यांवर श्रद्धा असली पाहिजे.
२) मेळाव्यात वधू-वरांना पोटजात सांगता किंवा लिहिता येणार नाही.
३)  नोंदणी शुल्क ५०० रुपये/-  ( ३ प्रवेशिका, ३ नाष्टा व भोजन कुपन, एक स्मरणिका मिळेल.)

*संयोजन समिती सदस्य:*
मा.शिवानंद हैबतपुरे,
मा. बसवराज कणजे,
मा. दशरथ वडतिले,
मा. सुरज त्रिमुखे, 
मा मिलिंद चवंडगे, 
मा. मंगेश दसोडे, 
मा सुरेश वाळके, 
मा अशोक हांचे,
मा. अशोक नगरकर, 
मा चंद्रशेखर हुमशाळ,
मा. मोहन जयशेट्टे, 
मा संजीव पाटील,
मा. चंद्रकांत खोचरे,
मा. संगमेश्वर शिवपुजे,
मा. प्रशांत हादगे,
मा. रमेश कोरे,
मा. गंगाधर मुपकलवार,
मा. राजू जुबरे,
मा. मधुकर लिंगायत,
मा. निलेश डहेनकर,
मा. महादेव जोकारे,
मा. अविनाश मार्तंडे,
मा सिद्धरामेश्वर नावदगेरे,
मा नरसिंह मुळे,
मा. संगमेश्वर मंदाडे,
मा. राजेश परमाळे,
मा.  सुनील समाने,
मा. धनंजय घोंगडे, मा. शिवानंद घाटके.

*ऑनलाइन नोंदणीसाठी संपर्क:*
अनंत सिंदाळकर, ७९७२८८४१८१, ९८६०५०९३६१.
vadhuvar.lingayatworld.com

*निमंत्रक:*
महाराष्ट्र बसव परिषद पुणे जिल्हा आणि सर्व समविचारी सुधारणावादी  बसवनिष्ठ कार्यकर्ते.
पोटजात सोडा, लिंगायत जोडा, या मोहिमेत सामील व्हा.

*सूचना:*
ज्यांची अशा प्रकारचे स्थळ स्वीकारण्याची तयारी आहे, त्यांनीच मेळाव्यात यावे, कोणालाही जबरदस्ती नसून प्रवेश ऐच्छिक आहे.
अभिषेक देशमाने. ९८२२०५४२९१.

मोळीगे मारय्यांचे वचन

In front of the town I saw a temple of god without God. The
temple priest did not see God to submit his offering and so went
in search of God. -Molige Marayya 8/1571

(शहराच्या समोर मी देवाशिवाय देवांचे मंदिर पाहिले.मंदिराच्या याजकाने आपले अर्पण सादर करण्यासाठी देवाला पाहिले नाही आणि त्यामुळे गेला नाही.देवाच्या शोधात -मोळीगे मारय्या 8/1571)

लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे.

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यात लिंगायत स्वतंत्र धर्ममान्यतेचे मोर्चे निघत आहेत. ही खूप सकारात्मक बाब आहे. लिंगायत महामोर्चात लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता द्यावी, या समाजकल्याणकारी मागणीसाठी मोर्चा निघत आहे. नांदेड , बिदर, गुलबर्गा, लातुर, विजापूर, सांगली यानंतर २८ जानेवारीला डबल धमाका करण्यासाठी कोल्हापूर आणि यवतमाळला मोर्चा निघत आहे. *स्वतंत्र धर्ममान्यतेचे मोर्चे कोणत्याही व्यक्तीच्या, जातीच्या, धर्माच्या, राजकिय पक्षाच्या विरोधात नाही, ते लिंगायतांच्या हक्कासाठी आहे.* हे मोर्चे विघातक नाहीतर विधायक आहेत. काही लोक पूर्वग्रहदूषित वृत्तीने मोर्चाला दुषणे देत आहेत. मोर्चाची नाहक बदनामी करत आहेत. *लिंगायत मोर्चासाठीं कर्नाटकचे मंत्री एम बी पाटील आणि नांदेडचे अविनाश भोसीकर हे दिवसरात्र सक्रिय राहून काम करत आहेत. यात त्यांचा कोणताही स्वार्थ नाही.*
स्वतःला नेते म्हणून घेणारे तथाकथित महेश गवाने,राजू कोरे,मनोहर कुरणे, चंद्रकांत मैगुरे, अभिजित हारगे, जयगौड कोरे आदी स्वतःला युवा नेते म्हणवून घेणाऱ्या तथाकथित नेत्यांनी दैनिक महाराष्ट्र टाइम्स मधून लिंगायत मोर्चा आणि लिंगायत नेते यांची बदनामी करण्याचा विडा उचलला आहे, पण समाज आज जागरूक झाला आहे.
मी या पुढे लिंगायत स्वतंत्र धर्म असल्याचे निकष देत आहे. लिंगायत हा परिपूर्ण स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत हा द्रविडीयन वंश आहे.लिंगायत जैन , बौद्ध शीख ख्रिश्चन या प्रमाणे स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत ही एक वैशिष्टयपूर्ण इष्टलिंग संस्कृती आणि समाज व्यवस्था आहे. लिंगायत ही इष्टलिंगधारी शरीरालाच मंदिर बनविणारी एक धर्म प्रकिया आहे. लिंगायत हे लिंगांगसमरस्याचे षडस्थल तत्वविज्ञान आहे. लिंगायत हा जीव शिव यांच्यामध्ये एकात्मता साधणारा शिवसंस्कार व शिवयोग आहे. लिंगायत हे अष्टवरणाला भक्तिमार्ग पंचाचराला कर्ममार्ग आणि षडस्थलाला ज्ञानमार्ग मानणारे आचारशास्त्र आहे. लिंगायत हे आचारशास्त्र हिंदुपेक्षा स्वतंत्र, पूर्णतः वेगळे , भिन्न आहे. लिंगायत हा महाशरणांच्या आणि महाशरणीच्या वचनांद्वारे विश्वचैतन्याच्या निर्धाराचा एक बसवयोग आहे. लिंगायत हे कायकाकवे कैलास या स्वयंपूर्णतेचा संदेश देणारे एक अर्थशास्त्र आहे. लिंगायत हे सदाचाराला स्वर्ग मानणारे एक नीतिशास्त्र आहे. लिंगायत ही दासोह स्वरूपातील एक सामाजिक सहकारनीती आहे. लिंगायत ही दयेलाच धर्म मानणारी एक मानवतावादी शिकवण आहे. लिंगायत हे स्वतंत्र , समता, बंधुता, सामाजिक न्याय व गौरव जोपासणारे एक न्यायशास्त्र आहे. लिंगायत हे स्त्री गौरवाचे व स्रीजगताच्या उद्धाराचे एक वैशिष्टयपूर्ण सूत्र आहे. लिंगायत वेदाला नव्हे तर, अनुभवाला प्रमाण मानणारा एक सिद्धांत आहे. लिंगायत एक विवेकवादी व वास्तववादी जीवनविषयक दृष्टिकोन आहे. लिंगायत हा संपूर्ण शाकाहारी सात्विक आणि समृद्ध जीवनपद्धती आहे. लिंगायत हा अवघ्या इष्टलिंगालाच आपले सर्वस्व मानणारा धर्म आहे. लिंगायत हा बसवेश्वरप्रणित इष्टलिंगधारणा स्वरूपातील एकेश्वरवादी शिवपासक धर्म आहे. लिंगायत निवृत्तीवादी नाही तर आशावादी आणि प्रवृत्तीवादी धर्म आहे. लिंगायत हस्तरेषेला महत्व न देता मनगटाच्या शकतील महत्व देणारा धरण आहे. लिंगायत हा मरणवे महानवमी म्हणजे मृत्यूला मोठा सण मानणारा धर्म आहे. लिंगायत हा एकूणच सुतकप्रथा मान्य नसणारा विज्ञानवादी धर्म आहे. (सुर्यकांत घुगरे यांचे अध्यक्षीय समालोचन.)
म्हणूनच लिंगायत हिंदू नाहीत, ते वीरशैव नाहीत. ते फक्त लिंगायत आहेत. स्वतंत्र धर्माच्या मागणी कोनचोही दिशाभूल करत नाही, याउलट सत्य लिंगायत धर्माचे सत्य सर्वांसमोर आणते आहे.
भिडे गुरुजीच्या प्रक्षोभकारक वक्तव्याने लिंगायतांच्या भावना दुखावल्या आहेत. वास्तविक पाहता ते वक्तव्य म्हणजे आळवा वरचे पाणी आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही. गुरुजींच्या मते, यामागे धर्मविरोधी शक्ती आहेत ? माझं तर अस म्हणणे आहे की त्यांनी त्या धर्मविरोधी शक्ती कोण ते सांगावे. जमिनीवर राहून आकाशातील ग्रहांच्या गोष्टी करू नये. भिडे गुरुजींचे वक्तव्य हे पूर्णपणे मूर्खपणाचे आणि फोल आहे.
आतापर्यंत पार पडलेल्या सर्व लिंगायत मोर्चाचे मुख्य उदिष्ट लिंगायत धर्माला धर्ममान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करून देणे हीच होती आणि यापुढेही हीच राहणार, यात काडीमात्र शंका नाही.
*कितीही सभा- मेळावे, मोर्च्या घ्या, कोणत्याही महाराजाला बोलवा, पण स्वतंत्र धर्ममान्यतेच्या मोर्चाच्या आड येऊ नका.*

नांदेडच्या मोर्चानंतर सुरु झालेली धर्ममान्यतेची चळवळ ही मला कल्याणक्रांतीच्या चळवळीकडे घेऊन जाते. नांदेड नंतर बिदर, बेळगांव, गुलबर्गा, लातुर, विजापूर, सांगली आणि आगामी काळात दुहेरी धमाका करत सबंध लिंगायत धर्मिय बांधव “लिंगायत स्वतंत्र धर्म आहे, आमच्या धर्माला धर्ममान्यता द्या.” अशी मागणी करत आहे. २८ जानेवारी २०१८ रोजी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि विदर्भातील यवतमाळ येथे मोठ्या संख्येने एकत्र येऊन लिंगायत धर्ममान्यतेचा एल्गार करणार आहे. पण काही समाजविघातक, समाजकंटक प्रवृत्ती या स्वतंत्र धर्म मोर्चाच्या विरोधात कटकारस्थाने करताना दिसत आहे, त्यांना आमचा विरोध मुळीच नाही. त्यांनी त्यांना हवे ते करावे, आम्ही विरोध करत नाही पण त्यांनी संपूर्ण लिंगायत धर्मियांची अस्मिता असणारे कोल्हापूर आणि यवतमाळ मोर्चाच्या विरोधात कोणतेही काम करू नये, अन्यथा बुद्धिजीवी लिंगायत समाज त्यांना कधीही माफ करणार नाही.
अभिषेक देशमाने..

मै महात्मा बसवण्णा का शरण हूँ ।

मै एक महात्मा बसवण्णा का शरण हुँ !
महात्मा बसवण्णा के पद पर चलता हुँ !
महात्मा बसवण्णा के वचनसाहित्य को ही अपना कर्म मानता हूँ !!

मै एक महात्मा बसवण्णा का शरण हुँ !
महात्मा बसवण्णा के राह पर चलता हुँ !
समता,समानता,विश्बंधूता इस विचार का
मै प्रचार प्रचार करता हु़ँ !!

मै एक महात्मा बसवण्णा का शरण हुँ !
बसवादी शरणगण को प्राणोसे प्रिय मानता हुँ !
बसवादी शरणगण ने जो विचार दिये
उसीका दिया जलाता हुँ !!

मै महात्मा बसवण्णा का शरण हुँ !
क्रांतीसुर्य के विचारो की क्रांती इस जग मी फैलाना चाहता हुँ !
क्रांतिकारी विचार का बारूद सब
लिंगायतो मै भरना चाहता हुँ !!

मै महात्मा बसवण्णा का शरण हु़ँ !
सब को आदरभावसे शरणु शरणार्थी कहता हुँ !!

सुनील समाने सर 9404832181

धर्मक्षेत्र वचनरक्षकक्षेत्र उळवीचा इतिहास:

उळवी वचन साहित्याच्या इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्वाचे स्थळ आहे. बसवादि शरणांची समताधिष्टीत वचनसाहित्य हेच लिंगायत धर्माचे धर्मग्रंथ आहेत. म. बसवण्णा स्थापित अनुभव मंटपातील अनेक स्तरातून आलेले शरण सहभागी झाले होते. शरणांची वचनचळवळ ही साहित्य चळवळ आहे. बसवादि शरणांच्या वचनांनी लिंगायत इतिहास आणि कन्नड साहित्य समृद्ध केले आहे. समता, समानता, स्वातंत्र्य, बंधुता, कायक, दासोह,मानव अधिकार आणि सामाजिक न्याय या समाजाला आवश्यक मूलभूत गरजांची पूर्तता करणारे साहित्य म्हणजे वचन साहित्य आहे.
कल्याणच्या क्रांतीत बिज्जल सैन्याने आणि प्रस्थापित कर्मठ सनातन लोकांनी शरण वचन भांडाराला आग लावली. त्यात बरेच वचन साहित्य नष्ट झाले, जे वाचले, शिल्लक राहिले ते घेऊन आमचे शरण चिन्मयज्ञानी चेन्नबसवेश्वरांच्या आणि माता अक्कानागाईच्या नेतृत्वाखाली उळवीच्या दिशेला निघाले. शरणी वरदानी गुड्डापूर दानम्मांच्या नेतृत्वाखाली गुड्डापूर (ता: जत, जि: सांगली) यांनी वचनसाहित्य वाहण्यासाठी शरणांना घोडे दिले. सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांच्या नेतृत्वाखाली सोलापूरला आले. सोंन्नलगीच्या महाराणी चामलादेवी यांनी शरणांना आश्रय दिला. वचन साहित्याला अभय दिले. डोक्यावर आणि पाठीवर वचनांचे गठ्ठे बांधून, हातात तलवार घेऊन, काही शरण घोड्यावर स्वार होऊन , काही पायी चालून कल्याण ते उळवी हे तब्बल सातशे किलोमीटरचे अंतर पायी चालून शरणांनी वचनसाहित्याचे रक्षण केले. कल्याणराज्याच्या बाहेर दूर अशा घनदाट, निबिड, भेसूर उळवीच्या जंगलातील गुहेत वचनसाहित्य सुरक्षित ठेवण्यात शरणांना यश प्राप्त झाले. वाटेत बिज्जल सैन्यांशी दोन हात करत शरणांनी वचनांचे रक्षण केले. या गणाचारी दलाचे नेतृत्व *महाशरण गणाचारी कक्कय्या, गणाचारी महाशरण मडिवाळ माचीदेव, चिन्मयज्ञानी चेन्नबसवेश्वर, माता अक्कनागलंबिका, सोडडळ बाचरस, नूल्लीय चंदय्या, किन्नरी बोमय्या* हे करत होते. उळवी क्षेत्र हे गोव्याच्या कदंब राजे पेर्माडी यांच्या राज्यक्षेत्रात होते. गोव्याच्या कदंब राजाने शरणांना आणि शरणसाहित्याला राजाश्रय दिला. कल्याणक्रांतीनंतर उळवी शरणांचे आश्रयस्थान आणि निवासस्थान बनले. याच भागात राहून शरणांनी अनुभव मंटप चालविला, शरण साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार प्रचार केला. याच उलवीक्षेत्रात *चिन्मयज्ञानी चेन्नबसवण्णांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी देह ठेवला. उळवी चेन्नबसवण्णांचे लिंगैक्य स्थळ आहे.*

यात्रा आणि उत्सव:

माघ शुद्ध पौर्णिमेला तेथे मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश या राज्यातून साहित्यप्रेमी, चेन्नबसवप्रेमी आणि लिंगायत बांधव येथे बहुसंख्येने येथे जमतात. यात्रेत रथोत्सव, पालखी, प्रसाद-दासोह चालतो. दोन लाख लोक यात्रेसाठी येतात. कार्तिक आमावस्येला वचन प्रवचन चालते.
सह्याद्रीच्या डोंगररांगा, उंच उंच वृक्ष, स्वच्छ हवा, मनाला मोहून टाकणारे निसर्गसौंदर्य नैसर्गिक पाण्याचे धबधबे वाघ,चित्ते, साप पर्यटकांचे खास आकर्षण ठरतात. उळवी क्रांतिभूमी, वचनभूमी आणि शरणभूमी आहे. वचन हे समतावादी आणि लोककल्याणकारी , क्रांतिकारी लोकसाहित्य आहे.

वचन साहित्य रक्षणासाठी उळवीच का निवडले ?

उळवी कल्याण राज्याच्या बाहेर होते. उळवी क्षेत्र गोव्याच्या कदंब राज्याच्या राज्यातील क्षेत्र असल्याने कदंब राजाने वचनसाहित्य आणि शरणांच्या रक्षणाची हमी दिली होती. नैसर्गिक गवी(गुहा), अतिदुर्गम घनदाट आरण्य, सुरक्षितता यामुळे शरणांनी उळवी या स्थळांची वचन साहित्य संरक्षणासाठी निवड केली.

उळवी क्षेत्र पाहण्यासाठी केव्हा जाल ?

ऑक्टोबर ते मे महिना हा उळवीच्या सहलीसाठी सर्वोत्तम काळ आहे. उळवी देवस्थानच्या वतीने निवासस्थानाची व्यवस्था केली आहे. उळवी हे गाव 250 घरे मिळून वसलेले छोटे, नागरी आणि शहरी वस्तीपासून दूर, प्रदूषणमुक्त, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले छोटे गाव आहे. गावात स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. गावात शाळा, दवाखाना, पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

उळवीला पाहण्यायोग्य शरणस्थळे:

१) चिन्मयज्ञानी चेन्नबसवण्णांची समाधी:

महात्मा बसवण्णांचे भाच चिन्मयज्ञानीे चेन्नबसवेश्वर हे एक उत्तम वचनकार आणि गणाचारी शरण होते. ते कल्याणच्या अनुभव मंटपाचे दुसरे अध्यक्ष होते. त्यांना षडस्थलचक्रवर्ती म्हणून गौरवण्यात येते. ” कुडलचेन्नसंगमदेवा ” हे चेन्नबसवण्णांचे वचनांकित आहे. त्यांची १७४२ वचने सध्या उपलब्ध आहेत.
कल्याणच्या प्रतिक्रांतीनंतर चेन्नबसवण्णा वचन साहित्य घेऊन उळवीला आले. वचनरक्षणार्थ चेन्नबसवेश्वरांचे योगदान अनमोल आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी चेन्नबसवण्णांनी उलवीला देह ठेवला. बिदनूरच्या केळदी राजांनी त्यांची समाधीमंदिर बांधले. समाधी मंदिराचा परिसर सहा एकर क्षेत्राचा आहे. समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात सुदंर चेन्नबसवण्णांची मूर्ती आहे. परिसरात पिंपळ रुईचे वृक्ष आहेत. येथे स्नानकुंड, स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची व्यवस्था आहे. हा परिसर घनदाट वृक्षांनी आच्छादिलेला आहे. समाधी मंदिराचे शिखर उंच व आकर्षक आहे. शरणांच्या कायकजीवी मूर्त्यांनी हे समाधीमंदिर खूपच आकर्षक बनले आहे. हे चेन्नबसवेश्वर समाधी मंदिर निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे.
चेन्नबसवेश्वरांना आश्रय देणाऱ्या गोव्याच्या कदंब राजाचे वंशज आजही उळवीला येतात. गोव्यात लिंगायत मठ आहेत.

२) शिवदेव समाधी:
शरणी अक्कनागलंबिकांचे पती, चेन्नबसवण्णांचे पिता शिवदेव वचनरक्षणासाठी उळवीत आले. त्यांची समाधी उळवीतील जळकुंडाजवळ आहे. धरणांच्या जलाशयात ही समाधी आणि जलकुंड बुडाले आहे.

३) अक्कमहादेवी मंदिर:

चेन्नबसवेश्वर समाधी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अक्कमहादेवी मंदिर आहे.

४) वचनवन उळवी:

इ. स. २०१० मध्ये ५ एकर परिसरात कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे वचनवन विकसित करण्यात आले आहे. तारेचे कुंपण करून आत शरण संस्कृतीनुसार शिल्पे उभी करण्यात आली आहेत.

५) उळवीच्या जंगलातील गुहा, धबधबे आणि हरळय्या कुंड:

चिन्मयज्ञानी चेन्नबसवेश्वर समाधीमंदिरापासून ३ किलोमीटर अंतरावर हरळय्या कुंड, अक्कनागम्मा गवी, विभूतीकणज, आकळगवी आहे. विरुद्ध दिशेला ८ किलोमीटर अंतरावर महामने गवी आहे. या गवी पाहण्यासाठी सोबत वाटाड्या, बॅटरी असावी.

६) हरळय्या कुंड:
शरण हरळय्यांच्या नावाने हरळय्या कुंड आहे. उळवीच्या जंगलात हा झरा प्रकट झाला आहे. उन्हाळ्यात थंडगार पाणी सतत वाहत असते. हा कुंड गोलाकार आहे. झऱ्याचे पाणी पाईपलाईनद्वारे पुढे नेऊन सुदंर धबधबा तयार झाला आहे. या धबधब्याखाली स्नान करण्याचा आनंद येथे लुटता येतो. कल्याणमध्ये वीरमरण पत्करलेल्या हरळय्यांच्या शौर्याचे हे प्रतीक आहे.

७) अक्कनागम्मा गुहा:
हरळय्या कुंडाच्या पुढे गेल्यास अक्कनागम्मा गवी आहे. आत मोठे भुयार आहे. येथे काही दिवस मुक्काम केल्यावर अक्कनागम्मा तरिकेरे जि. चिक्कमंगळूर येथे गेल्या. तुंगानदीकाठी त्यांची समाधी आहे. इंगळेश्वर, बसवकल्याण, नागलापूर येथे त्यांच्या नावाने गुहा आहेत. नागलापूर हे अक्कनागम्मांच्या नावाने वसलेले गाव आहे.

८) विभूतीकणज:
अक्कनागलंबिका गुहा पाहून पायवाटीने पुढे खोल दरीत उतरून गेल्यास विभूतीकणज गुहा आहे. गुहेत मध्यभागी मोठा गोलाकार पांढरा दगड आहे. आजूबाजूला उंचचउंच वृक्ष आहेत.

९) रुद्राक्षी मंटप:

आकळ गवीजवळ महावृक्षासमोर रुद्राक्षी मंटप आहे. या गुहेत आतील दगड रुद्राक्षासारखे आहेत. खडक बोटांनी वाजवला तर मृदुंग वाजविल्यासारखा आवाज येतो. म्हणून याला भजन मंटप म्हणतात.

१०) आकळगवी:

एका उंच डोंगरावर मध्यभागी आत एक नैसर्गिक गुहा आहे. गुहेपर्यत जाण्यासाठी लोखंडी पायऱ्या आहेत. गुहेत पाणी पाझरल्याने गाईच्या स्तनासारखे दगड निर्माण झाले आहेत. त्यातून सतत पाणी पाझरते म्हणून तिला आकळगवी म्हणतात. गवी म्हणजे गुहा. आकळ म्हणजे गाय असा अर्थ आहे. या गुहेत झोपून सरपटत आत प्रवेश करावा लागतो. अत्यंत निमुळती वाट, झऱ्याचे पाणी त्यातून पुढे चालत गेल्यास प्रवेशद्वार लागते. गुहेची लांबी ३०० फूट आहे. त्यासाठी आत १५ मिनिटे राहून गुहा पहावी लागते. पावसाळ्यात जाता येत नाही, कारण आत साप, जळू, पाणी असते.

११) घोडे मैदान :

महामनेकडे जाताना वाटेत विस्तीर्ण खुले मैदान आहे. गोव्याचे कदंब राजे आणि गुड्डापूर दानम्मांनी शरणांना दिलेले अश्वदल येथे थांबले होते.

१२) जगळद बेट्ट:

काळी नदीकाठी उंच टेकडीवर जगळद बेट्ट प्रसिध्द आहे. या डोंगरावर शरणांचा मुक्काम होता. या नदीकाठी गणाचारी शरण आणि बिज्जल सैन्य यांच्यात घनघोर युद्ध झाले. रक्ताचे पाट वाहिले. म्हणून या नदीला करीव्हळी म्हणजे काळी नदी नाव पडले. या बेटावर शरणांच्यात तात्विक मतभेद झाले. म्हणून या बेटाला जगळद बेट्ट म्हणतात.

१३) महामने गवी:
चेन्नबसवण्णा समाधीमंदिरापासून ८ किलोमीटर अंतरावर महामने गवी आहे. दुर्गम जंगल, पायवाट आणि नागमोडी नदी पार करत महामने गवीपर्यत जावे लागते. वचन ताडपत्राचे गट्टे घेऊन शरण या गुहेत राहिले. गुहेच्या बाहेर असणाऱ्या नदीचे नाव बोमय्या नदी आहे. महामनेजवळ शरण किन्नरी बोमय्यांची समाधी आहे. रस्ता नसल्याने गुहेपर्यत जाणे कष्टदायक आहे.

विशेष आभार आणि ग्रंथऋण:

आमचे मार्गदर्शक प्रा. भीमराव पाटील सर (लातुर) यांचे हा लेख बनविण्यासाठी विशेष साहाय्य मिळाले. प्रा. भीमराव पाटील सर लिखित ” उळवी- पर्यटन पुस्तिका.” विशेष उपयोगात आली. मडिवाळ माचीदेव, डोहर कक्कय्या आणि चेन्नबसवेश्वरांची वचनाच्या आधारे उळवीचा इतिहास मांडला आहे.

लेखक: अभिषेक देशमाने, नांद्रे, सांगली. 9822054291.